spot_img
spot_img

EXCLUSIVE बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ होणार! मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून कार्यवाहीच्या सूचना!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मभूमीचा सन्मान आणि असंख्य शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी आ. श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्याचे सांगितल्या जात आहे.

मातृतीर्थ सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी आहे, ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. बाल शिवबांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे बीज पेरून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवण्यात राजमाता जिजाऊसाहेबांचे योगदान अतुलनीय आहे.बुलढाणा जिल्ह्याला लोणार सरोवर, शेगावचे श्री गजानन महाराज मंदिर, मेहकरचे श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य, सैलानी बाबा दर्गा यांसारख्या धार्मिक व पर्यटनस्थळांची समृद्ध परंपरा लाभली आहे.

देश-विदेशातून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊसाहेबांचे नाव जगभर पोहोचावे, हादेखील या मागणीमागील उद्देश आहे.
अहिल्यानगरच्या धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याचा निर्णय घेतल्यास समस्त शिवप्रेमी आणि जिजाऊप्रेमींच्या भावनांचा सन्मान होईल. या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दखल घेत सामान्य प्रशासन विभागाला पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही निश्चितच समाधानाची आणि आशेची बाब आहे.
राजमाता जिजाऊसाहेबांच्या पवित्र स्मृतींना हीच खरी आदरांजली ठरेल, असे आमदार श्वेता महाले यांनी म्हटले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!