spot_img
spot_img

CRIME NEWS! कारमध्ये कोंबली गाय अन् मध्यरात्री सुसाट पळाले… मागे पोलीस लागले; २५ किलोमीटरच्या थरारानंतर गाडीचा दरवाजा उघडताच समोर आले धक्कादायक दृश्य!

खामगाव (हॅलो बुलढाणा) गोठ्यातून गाय चोरली… तिला कारमध्ये अक्षरशः कोंबले आणि अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी सुसाट पळ काढला! मात्र, खामगाव ग्रामीण पोलिसांनी तब्बल २० ते २५ किलोमीटर जीवघेणा पाठलाग करत चोरट्यांचा डाव उधळून लावला. बोरीअडगाव ते वाडेगावदरम्यान घडलेल्या या थरारक कारवाईत ३५ हजारांची गाय सुखरूप ताब्यात घेण्यात आली असून, चोरीसाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.

बोरीअडगाव येथील बाळासाहेब रामराव टीकार यांच्या पाच गायी बोरीअडगाव-शहापूर मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील गोठ्यात बांधलेल्या होत्या. ५ ऑगस्टच्या रात्री ११ ते पहाटे ३.३० वाजेदरम्यान चोरट्यांनी दहा वर्षांची पांढऱ्या रंगाची गाय चोरून टाटा कारमध्ये (एमएच ३१ एफसी १७८८) कोंबली आणि पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस सतर्क झाले. चालक कैलास हटकर आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष रिंढे यांनी जीवाची पर्वा न करता संशयित कारचा पाठलाग सुरू केला. पोलिसांचा ताफा मागावर असल्याचे पाहून चोरट्यांचे धाबे दणाणले. तब्बल २५ किलोमीटरच्या थरारानंतर पोलिसांनी कार पकडली; मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.

कारमधून ३५ हजारांची गाय सुरक्षित सोडवण्यात आली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांत बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार बाळकृष्ण फुंडकर फरार चोरट्यांचा शोध घेत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!