spot_img
spot_img

डिग्रस चौक रस्ता गेला खड्ड्यात! ठिकठिकाणी तुंबले पावसाचे पाणी; नागरिकांची कसरत, आंदोलनाचा इशारा!

देऊळगाव मही (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) पावसामुळे देऊळगाव मही ते डिग्रस या गावांना जोडणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील डिग्रस चौक रस्त्याची पुरती दुर्दशा झाली आहे.या उखडलेल्या रस्त्यावर तुंबलेल्या पावसाच्या पाण्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंतांना एका निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मौजे देऊळगाव मही ते डिग्रस, या गावांना जोडणारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील गाव जोड मौजे देऊळगाव मही मधून जाणारा रस्ता सध्या अत्यंत दयनिय अवस्थेत आहे. सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. त्यामुळे वाहनचालक, शेतकरी,विद्यार्थी, रुग्ण तसेच परिसरातील नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणी व त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सदर रस्त्यावरील विशेष डिग्रस चौक या ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे पावसाचे
पाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे रस्त्याची अधिकच दुरवस्था होत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. प्रवासी निवारा सध्या गाळ व कचऱ्यामुळे अडथळाग्रस्त अवस्थेत आहे. परिणामी पाणी रस्त्यावर साचून नागरिकांच्या दैनंदिन
वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होत आहे. तरी सदर ठिकाणी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून गाव जोड रस्त्याची आवश्यक दुरुस्ती, खड्डे बुजविणे, रस्त्याचे मजबुतीकरण तसेच पाण्याचा योग्य निचरा
होण्यासाठी व प्रवासी निवारा साफसफाई, दुरुस्ती अथवा आवश्यक ते बांधकाम तातडीने करावे,अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 8 दिवसानंतर संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर अथवा सदर रस्त्याच्या
ठिकाणी परिसरातील नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य संदीप राऊत,अनन्या इंगळे,धर्मराज खिल्लारे व ग्रामस्थांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!