spot_img
spot_img

BREAKING चप्पल बाहेर काढली… देवीचे दर्शन घेतले अन् गाभाऱ्यात केला लाखोंचा ‘खेळ’! मर्दडीच्या जागृत देवस्थानात पहिल्यांदाच धाडसी चोरी; CCTVतील ‘त्या’ सावल्यांच्या मागावर पोलिसांची पथके!

मर्दडी/दुधा (हॅलो बुलढाणा) इतिहासकालीन आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मर्दडी येथील देवी मंदिरात पहिल्यांदाच धाडसी चोरी झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून थेट गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवीच्या अंगावरील मौल्यवान सोन्याचे चार मंगळसूत्र, देवीच्या डोक्यावरील चांदीचा टोप तसेच चांदीची पादत्राणे असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी चप्पल बाहेर काढली, देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसून आल्याची माहिती आहे. श्रद्धेचा आव आणून देवीच्या दरबारातच हात साफ करणाऱ्या या चोरट्यांविरोधात भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. CCTV फुटेज, चोरट्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी विविध दिशेने पथके रवाना केली आहेत. चोरट्यांना पकडण्यासाठी मोठी रणनीती आखण्यात आल्याचे समजते.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजिनाथ मोरे आणि त्यांचे पथक चोरट्यांचा कसून शोध घेत असून, लवकरच या टोळीच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जागृत देवस्थानातील या चोरीचा तातडीने छडा लावून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!