spot_img
spot_img

मुंबई काँग्रेस कार्यालयावरील गोंधळ; लोकशाहीवर हल्ला! प्रविण (आप्पा) कदम म्हणाले.. विचारांना उत्तर विचारांनीच द्या!

धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/एस.बि.शेख) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या राजकीय वक्तव्याच्या निषेधाच्या नावाखाली मुंबईतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात घुसून गोंधळ घालण्यात आल्याची घटना अत्यंत निषेधार्ह असून, हा लोकशाही मूल्यांवरील थेट हल्ला असल्याची तीव्र प्रतिक्रिया मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा सिंदखेडचे सरपंच प्रविण (आप्पा) कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली.

बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या काही कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात प्रवेश करून गोंधळ घातल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करताना प्रविण (आप्पा) कदम यांनी लोकशाहीत मतभेदांना हिंसक किंवा आक्रमक मार्गाने उत्तर देणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष संविधान, लोकशाही आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत आहे. मतभेद असतील तर त्यांची उत्तरे विचारांनी, संवादातून आणि लोकशाही मार्गाने द्यावीत. पक्षाच्या कार्यालयात घुसून गोंधळ घालणे, दडपशाहीचे वातावरण निर्माण करणे आणि राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.
एखाद्या राजकीय वक्तव्याशी असहमती असू शकते. मात्र त्याचे उत्तर हिंसा, धमकी किंवा गोंधळातून नव्हे, तर सार्वजनिक कामगिरी, स्पष्ट भूमिका आणि जनतेचा विश्वास संपादन करून द्यावे. लोकशाहीत कोणत्याही नेत्याचे मूल्यमापन जनता करत असते; दहशत किंवा दबावाच्या माध्यमातून जनमत बदलता येत नाही.
राज्यात कायद्याचे राज्य अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर निष्पक्ष व कठोर कायदेशीर कारवाई करून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणीही प्रविण (आप्पा) कदम यांनी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!