spot_img
spot_img

ACCIDENT NEWS! धबधबा पाहायला गेला अन् अतिउत्साह युवकाचा ‘काळ’ बनला! बुलढाण्याच्या युवकाचा धबधब्यावरून ४० फुट खोल दरीत पडून मृत्यू!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा/सादिक शेख) पावसाळी दिवसात धबधबे पाहण्याची हौस असते.परंतु बुलढाण्यातील एका युवकाचा अतिउत्साह ‘काळ’ बनला असून, तो पाय घसरून ४० फुट खोल खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या गोद्री गावाजवळील (डालकीची धार धबधबा) येथे घडली आहे. आकाश अरुण पडघन (रा.बुलढाणा) असे मृतक युवकाचे नाव आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर जामनेर तालुक्यात असलेल्या गोद्री गावाजवळील धबधबा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. हा परिसर पावसाळ्यात निसर्गरम्य बनतो.त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील व लगतच्या परिसरातील अनेक पर्यटन प्रेमी हा धबधबा पाहण्यासाठी इथे जातात. बुलढाणा येथील
आकाश अरुण पडघन हा युवक देखील गोद्रीचा धबधबा पाहण्यासाठी गेला होता. आकाशने निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या धबधब्याचा नजरांना पाहिला.परंतु अतिउत्साहामुळे त्याचा पाय घसरला आणि आकाश जवळपास ४० फुट खोल दरीत पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनास्थळी यंत्रणा पोहोचल्यानंतर आकाशला जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आकाशच्या या अकाली जाण्यामुळे पडघन कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!