spot_img
spot_img

CRIME NEWS! बुलढाणा शहरात रात्री हॉटेलच्या खोल्यांवर कोणाची होती नजर? पहाटे ४.५० वाजता बाहेर पडली ‘ती’ संशयित बॅग… CCTV पाहताच उडाला थरकाप; हॉस्पिटलमधून लॉजमध्ये पोहोचली अन् मग

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील राधेय हॉटेल आणि त्याच परिसरात सुरू असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या कामाच्या ठिकाणी रात्रीच्या अंधारात वारंवार चोरी होत होती. लाखो रुपयांचे वायर बंडल, इलेक्ट्रिक साहित्य गायब होत असतानाही चोराचा कोणताच मागमूस लागत नव्हता. अखेर पहाटे ४.५० वाजताच्या CCTV फुटेजमध्ये एका इसमाच्या हातातील संशयित बॅग दिसली आणि संपूर्ण चोरीचा थरार उघडकीस आला.

बुलढाणा शहर पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, शांती निकेतन नगर परिसरातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विक्रम एकनाथ म्हस्के यांच्या सुनेच्या सह्याद्री हॉस्पिटलचे काम राधेय हॉटेलच्या काही भागात सुरू आहे. २६ जुलैच्या रात्री हॉस्पिटलमधील एका खोलीत ठेवलेले पॉलीकॅब कंपनीचे ३९ वायर बंडल, तांब्याचे रॉड, तार आणि इतर इलेक्ट्रिक साहित्य असा सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.

त्यानंतर पुन्हा खरेदी केलेले आर.आर. कंपनीचे २८ वायर बंडलपैकी फिटिंग केलेले २४ बंडल आणि खोलीत लॉक करून ठेवलेले चार बंडल, असा ५५ हजार रुपयांचा ऐवज ३० जुलैच्या रात्री गायब झाला.

वारंवार होणाऱ्या चोरीमुळे १ ऑगस्ट रोजी CCTV कॅमेरे बसविण्यात आले. २ ऑगस्ट रोजी पहाटे ४.५० वाजता एक इसम बॅग घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाला. हॉटेल व्यवस्थापकाने त्याची ओळख रूम क्रमांक १०८ मध्ये राहणारा अभिजीत ऊर्फ गणेश राजेश कदम अशी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, रूम क्रमांक २२० मधील धीरज टेकाळे यांचा सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीचा आयपॅड आणि थार वाहनाची चावीही चोरीला गेल्याचे समोर आले. पोलिसांच्या नोंदीनुसार, संशयिताने चौकशीत चोरी केल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

एकूण २ लाख ९० हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवि मोरे करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!