spot_img
spot_img

‘वाहतूक कोंडी’त गुदमरतोय विद्यार्थ्यांचा श्वास! शाळा परिसरातील ‘पॅक रस्ता’ ठरतोय जीवघेणा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत रस्त्यावर होणाऱ्या “वाहतूक कोंडी‘त शाळांमधील विद्यार्थ्यांचा श्‍वास गुदमरत आहे. मात्र वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यांमधून विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या मार्ग काढून देण्यासाठी प्रामुख्याने ऐडेड, भारत,शारदा व इतरही शाळांमध्ये विशेष प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात ‘हॅलो बुलढाणा‘ने केलेल्या सर्वेक्षणातून हे वास्तव निदर्शनास आले.परंतु ऐकणार कोण? एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यावर वाहतूक यंत्रणेला जाग येईल का? हा प्रश्न कळीचा मुद्दा बनला आहे.

भारत व एडेट आणि इतर शाळांच्या परिसरात शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असल्याचे दिसून आले. रहदारीच्या रस्त्यालगत असणाऱ्या शाळांच्या स्कूल बस, व्हॅन, रिक्षा यांना पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने ही वाहने रस्त्यावरच उभी राहतात. यात भरीस भर म्हणून मालवाहू ट्रक व इतर वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होते. दरम्यान विद्यार्थ्यांची वाहनात बसण्याची गडबड, सायकल किंवा पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा, यामुळे रहदारीचा रस्ता काही काळ “पॅक‘ होऊन जातो. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र सर्वेक्षणातून समोर आले. गल्ली-बोळात असणाऱ्या शाळांचीही स्थिती फार काही वेगळी नाही.या गंभीर समस्या कडे संबंधित यंत्रणेने लक्ष वेधण्याची मागणी जोर धरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!