spot_img
spot_img

रात्री दहापर्यंत असतो गडद अंधार..जीव धोक्यात घालून जगतो परिवार! जंगलातील सिंगल फेज रात्री 10 ऐवजी संध्याकाळी 6 वाजता देण्यात यावी; बजरंगी युथ फाऊंडेशनची मागणी!

नांदुरा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील शेंबा येथील महावितरण कंपनी मनमर्जी कारभार करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावात रात्री दहापर्यंत गडद अंधार असतो आणि ग्रामस्थ जीव धोक्यात घालून साप,विंचू आणि जीव घेण्या प्राण्यांच्या वावरात धोकादायक जीवन जगतात. त्यामुळे या जंगल भागातील सिंगल फेज लाईन रात्री 10 ऐवजी संध्याकाळी 6 वाजता देण्यात यावी,अशी मागणी बजरंगी युथ फाऊंडेशनच्यावतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सिंबा येथील महावितरण कार्यालय जंगलातील सिंगल फेज लाईन रोज रात्री 10 वाजता कार्यान्वित करते. मात्र पावसाळ्याचे दिवस असताना शेती शिवारात मोठ्या प्रमाणात परिवार वास्तव करत असताना आज त्यांच्या परिवाराला जीव मुठीत धरून अंधारात राहावे लागते आणि त्यांना रात्री उशिरा वीज मिळते त्यात कोणत्याच सुखसुविधा मिळत नाही, जंगली प्राणी साप इंचू अश्या प्राण्यापासून त्यांच्या जीवाला धोका ठरू शकतो याचा सर्व विचार करून बजरंगी युथ फाऊंडेशन ने पाऊल उचलत रात्री दहा ऐवजी येणारी लाईट संध्याकाळी सहा वाजता देण्यात यावी ही मागणी थेट महावितरण कार्यालय शेंबा येथे शेतकऱ्यांना घेऊन निवेदन देण्यात आली. निवेदनाची दखल दखल न घेतल्यास पुढील चार दिवसात कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. निवेदन देताना
जीवनसिंग राजपूत,विशाल जाधव, आकाश पाडोळकर,रवी पडोळकर, गोपाल गावंडे ,चेतन नारखेडे,अक्षय राजपूत,मुकुंदा पाडोळकर,
ओंकार नारखेडे, राजेश,मानकर , भगवान पाडोळकर व आदी शेतकरी व बजरंगी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!