spot_img
spot_img

चमकदार कामगिरी! प्रधुन्यला ‘चेसचा राजा’ व्हायचं! इंटरनॅशनल बुद्धिबळ स्पर्धेत एलसीबी कर्मचाऱ्याच्या मुलाला 1505 रेटिंग प्राप्त!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुद्धिबळ म्हणजे मोठे ध्येय,अचूक रणनीती आणि भविष्यातील यशाची तयारी असते. याच बुद्धिबळाच्या तयारीत असलेल्या येथील स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी सतीश मुळे यांचा मुलगा प्रधुन्य याने इंटरनॅशनल बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 1505 रेटिंग प्राप्त केल्याने तो कौतुकास पात्र ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ रेटिंग स्पर्धेमध्ये शारदा ज्ञानपीठच्या प्रद्यून्य मुळे याने आंतरराष्ट्रीय रेटिंग प्राप्त केले आहे. अहिल्यानगर येथे नुकतीच तिसरी ऑल इंडिया नरेंद्र फिरदोईया चषक क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये भारतातून जवळपास साडेतीनशे मुला मुलींनी भाग घेतला होता.सदर स्पर्धेमध्ये शारदा ज्ञानपीठचा विद्यार्थी प्रद्यून्य सतीश मुळे वर्ग नववा याने आंतरराष्ट्रीय रेटिंग 1505 रेटिंग प्राप्त केली आहे. प्रद्यून्य मुळे याने नऊ डावांमध्ये साडेचार गुण घेऊन ही रेटिंग मिळविली आहे.त्याच्या यशामध्ये माईंडचेस अकॅडमीचे अमोल इंगळे सर यांचे पाठबळ आहे. तसेच प्रद्यून्य सतीश मुळे हा माईनचेस अकॅडमी मध्ये नियमित सराव करतो. तो आपल्या यशाचे श्रेय त्याचे वडील सतीश मुळे, अमोल इंगळे सर,शरद नागरे सर,पत्की सर ,केळकर मॅडम यांना देतो त्याच्या यामुळे शारदा ज्ञानपीठ मध्ये पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. त्याच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!