खामगाव (हॅलो बुलढाणा) दोन ते तीन दिवसाच्या अतिवृष्टीने वित्तहानीच नव्हे तर जीवितहानी देखील केली. एका इयत्ता दुसरीतील मुलीच्या अंगावर भिंत कोसळल्याने तिचा करुण अंत झाल्याची मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. हातावर पोट असणाऱ्या आई-वडिलांची ही लेक अपघाती दगावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार,
खामगाव मार्गावरील नागसेन नगर,नालंदा वाचनालय परिसरात कृष्णा वसंत चव्हाण व त्यांची पत्नी रेखा यांचे वास्तव्य आहे.त्यांची दीक्षा ही मुलगी गांधी प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरी शिकत होती.आई धुणीभांडी करायची तर वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवायचे. परंतु नियती कधी काय डाव साधेल?याची शाश्वतीच नाही.वरूणराजाने या कुटुंबाकडे आपली वक्रदृष्टी टाकली. घराची भिंत कोसळून चिमुकल्या दीक्षा चा तडफडून मृत्यू झाला.ही हृदयद्रावक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या कुटुंबाला लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली जात आहे.











Total Users : 3215259