spot_img
spot_img

शक्तीपीठ महामार्गासाठी बळजबरीने शेतजमिनी बळकवण्याचा प्रयत्न करू नये! अन्यथा राज्यात संघर्षाचा वनवा पेटेल;रविकांत तुपकरांचा सरकारला खणखणीत इशारा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला सामान्य शेतकऱ्यांचा कोणताही पाठिंबा नाही. शेतकरी एक इंच ही जमीन देणार नसून,बळजबरीने जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न झाला तर राज्यात तीव्र संघर्षाचा वनवा पेटेल, असा खणखणीत इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.

महाराष्ट्रातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. हा माहामार्ग ८०२ किलोमीटरचा आणि अंदाजे ८६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा नागपूर-गोवा महामार्ग शेतजमिनी उद्ध्वस्त करणारा असल्याचे मत शेतकरी नेत्यांनी व्यक्त केले आहे. या महामार्गात जवळपास २७,५०० एकर सुपीक बागायती जमिनी जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या शक्तीपीठ महामार्गाला विशेषता कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. जमिनीला लेकरापेक्षा जास्त जीव लावतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांची जमीन जर कोणी जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर राज्यभरात तीव्र संघर्ष पेटणार, असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!