spot_img
spot_img

जळगाव जामोदला अवैध धंद्यांचा ‘खुला बाजार’? गुटखा, दारू, पत्त्यांचे क्लब अन् वरली-मटक्याची थेट एसपींकडे पोलखोल; कारवाई नाही तर ५ ऑगस्टपासून पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) शहरात कथितरीत्या खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात आता संतापाचा भडका उडाला आहे. गुटखा, अवैध दारू विक्री, पत्त्यांचे क्लब आणि वरली-मटका व्यवसाय तत्काळ बंद करण्याची मागणी करत सुलतानपुरा येथील अयाज अहमद नियाज अहमद यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत जळगाव जामोद–बुऱ्हाणपूर रोड, पेट्रोल पंप परिसर, जामोद रोड, नगर परिषद कार्यालयामागील भाग तसेच नांदुरा रोडवरील शाळेसमोर कथित अवैध व्यवसाय सुरू असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शहरातील काही हॉटेलांच्या बाजूला मोठे पत्त्यांचे क्लब, दारू विक्री आणि वरली-मटक्याची दुकाने सुरू असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

या अवैध धंद्यांमुळे शाळकरी मुले व तरुण व्यसनाधीनतेकडे ओढले जात असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीची प्रत मुख्यमंत्री, राज्यपाल, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.

तातडीने चौकशी करून कारवाई न झाल्यास ५ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा अयाज अहमद यांनी दिला आहे. आरोपांची अधिकृत पडताळणी अद्याप बाकी असून आता पोलीस प्रशासन कारवाईचा बडगा उगारते की मौन बाळगते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!