spot_img
spot_img

पळसखेड भटमध्ये अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर! जयंती केवळ प्रतिमापूजनापुरती नाही; विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देत साजरा केला ‘वाचन, लेखन व प्रेरणा दिन’

पळसखेड भट (हॅलो बुलढाणा/सचीन जयस्वाल) जगविख्यात साहित्यिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती पळसखेड भट येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत शनिवारी, १ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार अण्णाभाऊंचा जन्मदिवस ‘वाचन, लेखन व प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करत विद्यार्थ्यांना त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी साहित्याचा परिचय करून देण्यात आला.

यावेळी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय आणि अण्णाभाऊ साठे नगरातील नियोजित समाजमंदिराच्या जागेतही प्रतिमापूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू मांडोगडे होते. मुख्याध्यापक रामेश्वर उबरहंडे आणि सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड यांनी अण्णाभाऊंच्या साहित्य, संघर्ष व सामाजिक परिवर्तनाच्या कार्यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही प्रभावी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली.

भगवान गायकवाड यांच्या वतीने पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तर शाळेतर्फे खाऊ देण्यात आला. सरपंचपती गजानन सुरडकर, पंडितराव निकाळजे, ज्ञानेश्वर खंडागळे, भाग्यश्री गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!