मेहकर (हॅलो बुलढाणा) नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील कथित दिरंगाईमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहे.नागरिकांचे कामे होत नसल्याने हा जन्म मृत्यू विभाग मृत्यूशयवरच पडून असल्याचे दिसून येत आहे. परिणामी एकाने आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
मेहकर येथील शेषराव लंबे यांनी गेल्या महिना भरापासून आपल्या मुलाच्या जन्म दाखल्या संदर्भातील कामासाठी नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप केला आहे. या विभागाच्या दिरंगाईचा यापूर्वी देखील अनेक नागरिकांनी आरोप केलेला आहे. शेषराव लंबे यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा कार्यालयात जाऊनही त्यांच्या कामाबाबत केवळ टाळाटाळ केली जात असून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळाली नाहीत तर मुलाच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेषराव लंबे यांनी, “पुढील दोन तीन दिवसांत माझे काम झाले नाही तर मी पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करीन,” असा गंभीर इशारा दिला आहे.
दरम्यान, जन्म-मृत्यू विभागात इतर नागरिकांची कामेदेखील वेळेत होत नसल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे या विभागातील कामकाजाची चौकशी करून नागरिकांना तत्पर सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.नागरिकांनी मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन जन्म-मृत्यू विभागातील दिरंगाई दूर करावी आणि नागरिकांची प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावावीत, अशी मागणी केली आहे.










Total Users : 2728643