बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. जळगाव जामोद तालुक्याला पावसाचा तडाखा बसला. येथील 7 मोठे व 4 लहान जनावरे पुरात वाहून गेले, तसेच 5 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे तर शेगावातील एका वृद्ध महिलेचा भिंत अंगावर कोसळून करून अंत झाला.तसेच काही ठिकाणची शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.मोताळा तालुक्यातील तळणी येथे 6 गायी व एक बैल वीज पडून ठारझाल्याची घटना घडली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे.आजही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले, धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत.जळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे.या परिसरातील शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.पूरसदृश्य परिस्थितीमुळे काही पूलांवरून पाणी वाहत असून,संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकृत माहितीप्रमाणे शेगावच्या फुलेनगर येथील 85 वर्षीय सरस्वती पल्हाडे या वृद्ध महिलेचा पावसामुळे भिंत अंगावर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 30 जुलै च्या रात्री घडली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील पावसाच्या तांडवामुळे परिसरातील शेती पाण्याखाली गेली असून, 11 पाळीव जनावरे पुरात वाहून गेली आहे.तसेच 5 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. मोताळा तालुक्यातही पावसाने कहर केला असून तळणी येथे 6 गाई आणि एक बैल वीज पडून मृत झाला आहे.










Total Users : 2728770