spot_img
spot_img

आरोपींच्या मुसक्या आवळणार नाही ते पोलीस कसले? -10,89,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत – 5 आरोपी जाळ्यात

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जबरी चोरी, मो.सा.चोरीतील सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. ही स्था.गु.शा.ची यशस्वी कारवाई आहे. डिझायर, पिकअप, 4 मो.सा.,5 – मोबाईल व रोख सह 10,89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर 5 आरोपी अटक करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून,पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांनी सदर गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी पो.स्टे. देऊळगांव राजा अप.क्र 269 / 2024 कलम 309, भारतीय न्याय संहिता, पो.स्टे. डोणगांव अप.नं.135/2023 कलम 379 भा. दं. वि. गुन्ह्याची तांत्रीक माहिती तसेच गोपनीय बातमीदाराने खात्रीलायक बातमी माहिती मिळाली.
फिर्यादी सिध्देश्वर कडूबा राऊत, रा. सावरखेडा ता. जाफ्राबाद जि. जालना यांनी पो.स्टे. देऊळगांव राजा येथे रिपोर्ट
दिला की, देऊळगांव राजा ते सिंदखेड राजा रोडवरुन फिर्यादी व त्याचा सोबती चालक असे त्यांचे वाहन
TATA 407 MH-43 AD-7599 असे जालना येथून जाफ्राबाद येथे माल घेवून जात असतांना, 04 अनोळखी इसमांनी त्यांचे
स्विफ्ट डिझायर वाहन आडवे लावून, फिर्यादी व चालक यांना लोखंडी रॉडने मारहाण करुन, फिर्यादी व चालक यांचे जवळीलनगदी, मोबाईल, साहित्य असा एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला होता. दरम्यान सदर गुन्ह्यात जालना जिल्ह्यातून आरोपी अटक करण्यात आले आहेत.संदिप बंडुराव गंगावणे वय 32 वर्षे रा. चांदई एको. ता. जाफ्राबाद ह.मु. हिंदनगर, नवीन मोंढा, जालना, युसूफ शेख अब्दुल करीम बय 27 वर्षे रा. हिंदनगर, नवीन मोंढा, जालना,
हर्षल शिरीष अग्रवाल वय 23 वर्षे, रा. भाजीमंडी, गोल मस्जीदजवळ, जालना, सुरेश अशोक मोरे रा. लालबाग, देऊळगांव राजा रोड, जालना अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीचे ताब्यातून हस्तगत चोरीला गेलेला ईलेट्रीक मुद्देमाल कि 3,00,000 रुपये,मोबल फोन-06 नग किं.50,000 रुपये, एक HERO HF DELUX मो.सा. किं. 40,000/- रुपये, एक DEZIRE कार किं 3,00,000 रुपये,
एक मालवाहू पिकअप- 3,00,000रुपये,
नगदी रोख रक्कम – 9,500 रुपये असा एकूण- 9,99,500 रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच
फिर्यादी शंकर विष्णु पवार रा. डोणगांव ता. मेहकर यांनी पो.स्टे. डोणगांव येथे रिपोर्ट दिला होता की,आमले मंगल कार्यालय, डोणगांव येथून त्यांचे मालकीची मो.सा. हिरो स्प्लेंडर क्र. MH28-BD-1890 किं. 30,000 रुपये ही
कोणी तरी अज्ञात इसमांने चोरुन नेली. या प्रकरणी आरोपीला पुणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली.संतोष ऊर्फ शरद गजानन इंगोले वय 28 वर्षे रा. पांगरी कुठे ता. मालेगांव जि. वाशिम, ह.मु. चाळीस फुटी आळंदी, पुणे असे या आरोपीचे नाव आहे.
यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेली एक मोटार सायकल किं. 30,000 रुपये,ईतर दोन स्प्लेंडर कंपनीच्या मोटार सायकली किं. 60,000 रुपये असा एकूण- 90,000/-रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर दोन्ही गुन्ह्यातील ईतर फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे प्रभारी ठाणेदार अशोक लांडे व यांच्या पथकाने केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!