spot_img
spot_img

शाळा सोडल्याचा दाखला अन् मार्कलिस्टसाठी पैसे मागाल तर खबरदार! शिक्षण विभागाचा दणका; बुलढाण्यातील ‘त्या’ शाळांवरही वचक!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कलिस्ट देताना विद्यार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या शाळांना आता शिक्षण विभागाने थेट इशारा दिला आहे. शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पत्र क्र.२९७७ वरून राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देत अशा बेकायदेशीर वसुलीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

दहावी, अकरावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी दाखला व मार्कलिस्ट घेण्यासाठी शाळांकडे जातात. मात्र काही शाळा याच संधीचा गैरफायदा घेत विद्यार्थ्यांकडून पावत्या फाडून २०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम घेत असल्याच्या तक्रारी शिक्षण संचालनालयाकडे पोहोचल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील तक्रारीवरून हा आदेश निघाला असला तरी त्याचा दणका बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या-मोठ्या शाळांनाही बसणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातही काही नामांकित शाळांकडून दाखला व मार्कलिस्टसाठी पावत्या फाडून रक्कम घेतली जात असल्याची चर्चा पालकांमध्ये आहे. आता अशा शाळांनी सावध व्हावे, कारण विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली केल्यास कारवाई अटळ आहे. घेतलेले पैसे विद्यार्थ्यांना परत करावे लागतील आणि संबंधित शाळांवर शिक्षण विभागाचा चाबूक बसू शकतो.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!