देऊळगांव राजा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्र राज्यातील महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वालंबनासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. महिलांचा श्रम सहभाग पुरषांच्या तुलनेत कमी आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिरिथती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णयाक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनामार्फत मख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहान मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.लाभार्थ्यांची पात्रता खालीलप्रमाणे आहेत. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहीत, विधवा, घटसफोटीत, परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहीत महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्णव कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्याच्या कुटुंबांच्या एकुण वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख मयादित असावे सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत 1) आधार कार्डची प्रत (दोन्ही बाजुने) 2) अधिवास प्रमाणपत्र. नसल्यास, त्याऐवजी महिलेचे 15 वर्षापूर्वीचे (1) रेशनकार्ड (2) मतदार ओळखपत्र (3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (3) जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र सादर करावे. (परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाया पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचे (1) नन्म दाखला किंवा (2) शाळा सोडल्याये प्रमाणपत्र किंवा (3) अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे. ) उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न रु.. 2.50 लाखापर्यत असणे अनिवाय) तथापि पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातुन सूट राहील. त्याकरित रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी (4) अर्जदाराचे नमुन्याप्रमाणे हमीपत्र( 5) बँक पासबुक (आधार लिंक असलेले (6) अर्जदाराचा फोटो स्वत: लाभार्थी महिला उपस्थित असणे आवश्यक आहे.सदरचे अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने करण्याची शेवटची दि. 31 ऑगष्ट, 2024 ही आहे. या तारखेनंतर प्राप्त होणान्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. लाभार्थयानी 0nline अर्ज करण्याकरिता नारी शक्ती दुत अँपद्वारे नोंदणी करावे.नारी शक्ती दुत अॅपद्वारे अर्ज करण्याकरिता खालील लिंकवर किलिक करावे htp:play.google.com/store/apps/detalls?id-=-com.saavintinet.narishakti yojana doot अधिक माहीतीसाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना कक्ष, नगर परिषद देऊळगांव राजा जि.बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा. तरी गरजु व पात्र महिला लाभाथ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन न.प.प्रशासनामार्फत मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे
- Hellobuldana