spot_img
spot_img

बारावीच्या परीक्षेत सुनगावच्या अंगणवाडी सेविकेची भरारी..!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, हे जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील एका जिद्दी महिलेने सिद्ध करून दाखवलं आहे. सुनगाव केंद्र क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका चंदाताई चिंचोलकर यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी बारावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.

जिद्दीने गाठले यश
​कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी सांभाळत असतानाही शिक्षणाची ओढ कायम असलेल्या चंदाताईंनी फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (HSC) परीक्षा दिली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांनी ७३.८३% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
​त्यांच्या गुणांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
​मराठी: ८१,​सहकार : ८७,​राज्यशास्त्र: ८१,​अर्थशास्त्र: ७५,
​इतिहास: ७२,​इंग्रजी: ४७, विषयात एवढे गुण मिळाले असून एकूण ६०० पैकी
​४४३ घेऊन त्या उत्तीर्ण झाले आहेत.
​सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
​सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही, केवळ पदवी किंवा सर्टिफिकेटसाठी नव्हे, तर ज्ञानाच्या ओढीपोटी त्यांनी ही परीक्षा दिली. विशेषतः मराठी आणि सहकार या विषयांत त्यांनी मिळवलेले गुण त्यांच्या अभ्यासातील चिकाटी दर्शवतात. त्यांच्या या यशाबद्दल जळगाव जामोद तालुक्यातून आणि शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘इच्छा तिथे मार्ग’ या उक्तीप्रमाणे चंदाताईंनी मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी आणि शिक्षण अर्धवट राहिलेल्या महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!