spot_img
spot_img

बुलढाण्यात रंगणार शब्दांचा जंगी जल्लोष! ‘बहारदार काव्यमैफिल’ आयोजन

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात साहित्यप्रेमींसाठी एक खास पर्वणी सज्ज झाली आहे! बुलडाणा अर्बन परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘बहारदार काव्यमैफिल’ येत्या २ मे रोजी गोवर्धन सभागृहात रंगणार असून, काव्यरसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सायंकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या या मैफलीत महाराष्ट्रातील नामवंत कवी आपल्या शब्दांच्या जादूने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. कल्याणचे प्रशांतदादा मोरे, नाशिकचे संदीप जगताप, जळगावच्या सौ. रत्नमाला शिंदे-सोनवणे आणि बुलढाण्याचे विशाल मोहिते हे कवी आपल्या धारदार, भावपूर्ण आणि समकालीन कवितांनी वातावरण भारून टाकणार आहेत.

या काव्यमैफलीचे निवेदन अकोल्याचे गोपाल मापारी करणार असून, त्यांच्या खुमासदार शैलीमुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत येणार आहे.

साहित्य, भावना आणि सामाजिक भान यांचा संगम असलेल्या या काव्यमैफलीकडे संपूर्ण बुलढाण्याचे लक्ष लागले आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या काव्यसोहळ्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!