बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यात आज दहा जुलैला अनेक जिल्ह्यांत पहाटेच भूकंपाचे धक्के, जमिनीतून गूढ आवाज आल्याने नागरिक भयभीत झालेत. विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, डोणगाव येथे सौम्य धक्के जाणवले असून, भूकंपाची तीव्रता 4.5 एवढी आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जिल्ह्याच्या रिसोड, वाशिम तालुक्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. याशिवाय हिंगोली, याशिवाय हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच जमिनीतून गूढ आवाजही आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे
वाशिम जिल्ह्याच्या रिसोड, वाशिम तालुक्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी दोन वेळा 3 ते 5 सेकंद हे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे सकाळी 07:14 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंपाची नोंद झाली आहे.परभणी शहर आणि परिसरात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. नांदेड शहरात सकाळी सव्वासात वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. उत्तर नांदेड शहरासह अर्धापूर तालुक्यात काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, सौम्य धक्क्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. राज्यात कुठेही भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास धक्के बसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. भूकंपांच्या धक्क्यामुळे छताचे पापुद्रे पडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, प्रशासनाकडून पाचोड परिसरातील भूकंपाला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील लोणार डोनगाव येथेही भूकंपाचे धक्के बसले असून जिल्हा यंत्रणा घटनास्थळावर पोहोचली आहे.