spot_img
spot_img

बुलढाण्यात ‘स्ट्राँग वुमन’ची दमदार एंट्री; क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आंतरराष्ट्रीय पावरलिफ्टिंग खेळाडू व ‘स्ट्राँग वुमन ऑफ इंडिया’ किताब विजेत्या भक्ती अजित आंब्रे यांनी बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार स्वीकारत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नवी ऊर्जा निर्माण केली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार 15 एप्रिल 2026 रोजी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली.

यापूर्वी त्या पालघर येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत शासनाने पदोन्नती देत त्यांची बुलढाणा येथे नियुक्ती केली. पावरलिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना ‘स्ट्राँग वुमन ऑफ इंडिया’ किताबासह प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे.

स्वतः एक यशस्वी खेळाडू असल्याने जिल्ह्यातील पावरलिफ्टिंगसह विविध क्रीडा प्रकारांना चालना देत नवोदित खेळाडूंना संधी व प्रोत्साहन देण्यावर त्या भर देणार आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे बुलढाण्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

यावेळी त्यांनी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी बि. एस. महानकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साहात स्वागत केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!