बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खामगाव तालुक्यात 12 पैकी 8 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने ‘हॅलो बुलढाणा’ने नुकसानीवर दृष्टिक्षेप टाकलाय.. एकूण 243 घरात पुराच्या पाण्याने शिरकाव केल्याने मोठे नुकसान झाले तर 89 कच्च्या घराची अशंतः पडझड झाल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
खामगाव तालुक्यात 7 व 8 जुलै रोजी 12 पैकी 8 महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. आवार या महसूली मंडाळामध्ये 219.3 MM एवढा पाऊस पडला आहे. त्यामुळे नदीनाल्याचे काठावरील गावामधिल एकुण 243 घरामध्ये 7 व 8 जुलै रोजी पुराचे पाणी शिरल्याने घरातील धान्याचे व इतर वस्तुचे नुकसान झालेले आहे व घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झालेली आहेत. यासोबतच एकुण 3 कच्च्या घरांचे पूर्णतः नुकसान झालेले आहे व एकुण 89 कच्च्या घराची अशंतः पडझड झालेली आहे.