spot_img
spot_img

गॅस टंचाईचा लग्नसराईवर घाला! मुहूर्त मर्यादित… आता पर्यायच एकमेव आधार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईने मोठे संकट निर्माण झाले आहे. विवाह सोहळ्यांचे नियोजन धोक्यात आले असून मंगल कार्यालय चालक, केटरर्स आणि पालकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. मार्च ते जुलैदरम्यान अवघे ३० मुहूर्त उपलब्ध असल्याने वेळ चुकल्यास थेट २०२७ पर्यंत प्रतीक्षा करण्याची वेळ येणार आहे.

मध्य पूर्वेतील तणावामुळे देशभरात गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा रंगली असून बुलढाण्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. काही ठिकाणी घरगुती सिलिंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. यामुळे केटरिंग व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

दरम्यान, प्रशासनाने घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत तपासणी मोहीम सुरू केली आहे. परिणामी, मंगल कार्यालयांनी डिझेल शेगड्या, लाकडी चुली यांसारख्या पर्यायांकडे वळण्यास सुरुवात केली आहे.

“बुकिंग रद्द नाही, कोणत्याही परिस्थितीत लग्न पार पडणारच!” अशी ठाम भूमिका व्यावसायिकांनी घेतली आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!