spot_img
spot_img

बुलढाण्याचे ‘दृष्टीदाते’ डॉ. रवी शिंदे; हजारो रुग्णांच्या आयुष्यात उजेड, आज वाढदिवस!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) डोळ्यांच्या आजारांवर अचूक उपचार करून हजारो रुग्णांच्या आयुष्यात प्रकाश पेरणारे बुलढाण्यातील नामांकित नेत्रतज्ज्ञ डॉ. रवी शिंदे यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. आपल्या कुशल वैद्यकीय सेवेच्या जोरावर त्यांनी असंख्य रुग्णांना नवसंजीवनी दिली असून, अनेकांच्या जीवनात अक्षरशः उजेड आणला आहे.

डोळ्यांचे विविध आजार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच आधुनिक उपचार पद्धतींमुळे डॉ. शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्यात विश्वासार्ह डॉक्टर म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या साधेपणामुळे, रुग्णांप्रती असलेल्या संवेदनशीलतेमुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे रुग्ण त्यांना डोळ्यांचे “देवदूत” म्हणून संबोधतात.

रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन व उपचार देणे हीच त्यांची खरी ओळख ठरली आहे. त्यामुळेच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक रुग्ण, नागरिक आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

डॉ. रवी शिंदे यांना निरोगी आयुष्य, उत्तम आरोग्य आणि त्यांच्या सेवाभावी कार्याला अधिक यश लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा “हॅलो बुलढाणा” परिवाराकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!