spot_img
spot_img

आमदार, कैदी अन् कमोड! विधान परिषदेत धीरज लिंगाडे यांची मागणी चर्चेत

मुंबई (हॅलो बुलडाणा)  ‘महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक, २०२५’ वरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी जेलमधील कैद्यांसाठी कमोडची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत विधान परिषदेत जोरदार भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात चर्चा रंगली.

लिंगाडे म्हणाले की, जेलमध्ये असलेला प्रत्येक कैदी हा गुन्हेगारच असतो असे नाही. अनेकदा विविध परिस्थितींमुळे व्यक्तीला शिक्षा भोगावी लागते. कारागृहात मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध कैदीही असतात. अशा कैद्यांना इंडियन टॉयलेट वापरणे कठीण जाते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कमोडची सुविधा असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

“कैदी असला तरी तो शेवटी माणूसच आहे. राज्य सरकार कैद्यांसाठी कँटीनसारख्या सुविधा उपलब्ध करून देत आहे, तर त्याचप्रमाणे वयोवृद्ध व आजारी कैद्यांसाठी कमोडची सुविधा देण्याचाही विचार व्हायला हवा,” असेही लिंगाडे यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही सदस्यांनी समर्थन तर काहींनी टीका केली. मात्र कैद्यांच्या मूलभूत सुविधांबाबतचा हा मुद्दा राज्याच्या कारागृह व्यवस्थेवर नवी चर्चा निर्माण करणारा ठरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!