बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक उन्नतीचा ध्यास घेत सातत्याने उपक्रम राबविणाऱ्या बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी तर्फे यंदाही भव्य ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. “रन फॉर फॉरेस्ट” या दमदार ब्रीदवाक्यासह १ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजता गजानन महाराज संस्थान अंतर्गत स्वयंप्रकाश संस्थान, गिरडा येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
संस्थेचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक (भाईजी) यांनी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अशा तीन गटांत स्पर्धा होणार असून १० व २१ किमी गटासाठी वेळेची मर्यादा लागू राहणार आहे. ऑनलाईन नोंदणी २४ फेब्रुवारी रात्री १२ वाजेपर्यंत खुली आहे.
२८ फेब्रुवारी रोजी सहकार विद्या मंदिर, सांस्कृतिक सभागृह येथे टी-शर्ट, बीब नंबर व गुडी बॅगचे वितरण होईल. फिनिशर मेडल, नाश्ता, वैद्यकीय सुविधा आणि संपूर्ण मार्गावर आवश्यक सोयी उपलब्ध असणार आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात धावण्याची संधी साधत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही मॅरेथॉन पुन्हा एकदा बुलढाण्यात उत्साहाचा महापूर आणणार आहे.











