spot_img
spot_img

बुलढाणा जिल्ह्याला मिळाला विभागस्तरीय स्पर्धा यजमानतेचा मान; 1177 खेळाडूंनी क्रीडानगरीत रंगणार जल्लोष!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा)  अमरावती विभागातील पाच जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे यजमानपद यंदा बुलढाणा जिल्ह्याला मिळाल्याने जिल्ह्याची प्रतिष्ठा उंचावली आहे. 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या भव्य स्पर्धेत विभागीय कार्यालयासह पाच जिल्ह्यांमधील तब्बल 1177 खेळाडू सहभागी होत असून क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये 694 पुरुष व 483 महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य दाखवणार आहेत.

बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या खेळाडूंसाठी निवास व भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण नियोजनासाठी 82 अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमुळे बुलढाणा क्रीडानगरीत बदलणार असून विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. विभागस्तरीय स्तरावर होत असलेल्या या भव्य आयोजनामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळणार असल्याचे चित्र आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!