spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ऍड. नाझेर काझी यांच्या वडिलांचे दुःखद निधन

सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा) अत्यंत दुःखद बातमी अशी की, ऍड. नाझेर काझी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच जिल्हाध्यक्ष बुलढाणा यांचे वडील, शहर-ए-काझी खुल्दआशियानी काझी सय्यद मंजुरुल हसन साहेब (झौक) यांचे आज दिनांक 26 जानेवारी 2026, सोमवार रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 90 वर्ष होते.

काझी सय्यद मंजुरुल हसन (झौक) साहेब हे धार्मिक, सामाजिक व न्यायप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून सिंदखेडराजा परिसरात परिचित होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक धार्मिक व सामाजिक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. त्यांच्या निधनामुळे काझी कुटुंबावर तसेच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पार्थिवावर दफनविधी दिनांक 26 जानेवारी 2026, सोमवार रोजी दुपारी 3.00 वाजता जामा मस्जिद, सिंदखेडराजा येथे विधिवतरीत्या संपन्न होणार आहे. अनेक मान्यवर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
हॅलो बुलडाणा परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!