बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील चैतन्यवाडी परिसरात आज अचानक पाईपलाईन लिकेज झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. थेट पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या जवळच रस्त्यावरून अक्षरशः हजारो लिटर पाणी वाहू लागल्याने नागरिकांना काही काळ महापूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागला. रस्त्यावर साचलेले पाणी धरणाच्या धबधब्यासारखे वेगाने वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते. मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखताच नगरपालिका प्रशासनाने तात्काळ हालचाल केली.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे कर्मचारी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून पाण्याचा प्रवाह नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले असून सध्या परिस्थिती आटोक्यात आली आहे












