spot_img
spot_img

डिग्रस बुद्रुकमध्ये अवैध रेती साम्राज्यावर धडक! 1 कोटी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त – अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई

देऊळगावराजा (हॅलो बुलडाणा) डिग्रस बुद्रुक गावात अवैध रेती माफियांनी उघडपणे उभारलेलं साम्राज्य विभागीय आयुक्त अमरावती यांच्या पथकाने आणि अंढेरा पोलिसांनी धुळीस मिळवलं आहे. मध्यरात्री 2 ते पहाटे 4 या वेळात झालेल्या धडक कारवाईत तब्बल 25 ते 30 ब्रास अवैध रेती, 7 हून अधिक टिप्पर, जेसीबी असा मिळून सुमारे 1 कोटी 5 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी काशिनाथ इप्पर (मंडळ अधिकारी, देऊळगाव राजा) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, कारवाईदरम्यान आरोपी उमेश पऱ्हाड, धनंजय मिसाळ, रविंद्र लाड आणि भरत पऱ्हाड यांच्या मालकीच्या जागेत अवैधपणे साठवून ठेवलेली मोठ्या प्रमाणात रेती आढळून आली. गावाच्या उत्तरेस गट क्रमांक 450 मध्ये उमेश पऱ्हाड यांच्या शेतापासून सुरुवात झालेल्या या तपासात रेतीचे ढिग, उभ्या टिपर्स, जेसीबी आणि विना नंबरच्या गाड्या एकामागून एक उघड होत गेल्या.

फक्त एका जागेतच 30 ब्रास अवैध रेती आणि 7 लाखांची जेसीबी, तर विविध ठिकाणी 6 पेक्षा जास्त टिपर्स जप्त करण्यात आल्या. काही वाहने विना नंबर असल्याचंही समोर आलं.ज्यातून अवैध धंद्याचा काळाबाजार किती खोलवर रुजला आहे याचा अंदाज येतो.

पोस्टे अंढेरा येथील HC रावसाहेब मुंडे यांनी गुन्हा नोंदविला असून तपासाची सूत्रे पो.उ.नि. दिनेश घुगे यांच्या हाती आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 48(7), 48(8) आणि BNS कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!