spot_img
spot_img

बुथ ते नगराध्यक्ष! : चिखलीत ‘पंडित पर्व’ निश्चित? आमदार श्वेताताईंचा भक्कम आधार; स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार जनमानसात

चिखली (हॅलो बुलडाणा) नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडितराव देशमुख जनसामान्यांमध्ये रुजलेले व्यक्ती असुन यांच्या व्यक्तिमत्त्वाला थेट आमदार श्वेताताई महाले यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याचा भक्कम आधार मिळाल्याने, चिखली शहरात ‘पंडित पर्व’ सुरू होण्याची शक्यता आहे.
पंडितराव देशमुख यांची ‘स्वच्छ प्रतिमा’ आणि ‘विकासनिष्ठ नेतृत्व’ हीच त्यांची खरी ताकद ठरली आहे. काँग्रेसकडून त्यांना आव्हान देणारा उमेदवार असला तरी चिखलीच्या जनतेने आता एकाच वेळी विधायक आणि निष्कलंक नेतृत्वाला पाठिंबा देण्याचे ठरवले असल्याचे चित्र आहे.पंडितराव देशमुख यांना केवळ एक सामान्य राजकारणी नव्हे, तर प्रशासकीय निर्णयक्षमतेसह स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. ‘त्वरित निर्णय घेण्याची क्षमता’ आणि ‘पारदर्शक कारभार’ करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही राजकीय चिखलापासून दूर राहिल्याने, ‘हाच तो माणूस जो शहराला नीट करेल’ असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा अनुभव

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!