बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्याच्या मातीतले कोहिनूर प्रा. डॉ. जे.बी. देव्हडे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अमरावती विभागीय सल्लागार समितीवर नियुक्ती झाल्याने ही बाब बुलढाणेकरांसाठी अभिमानाची ठरली आहे.
जीवन विकास शिक्षण संस्था रिसोडचे कार्यकारी अधिकारी (उच्च शिक्षण ) तथा स्व पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ जे बी देव्हडे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अमरावती विभागीय केंद्र सल्लागार समितीच्या वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून मा. कुलगुरू यांचे मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाच्या विभागीय कार्यपद्धतीत अधिक सुधारणा होणे यासाठी विभागीय केंद्राच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्याचे प्रत्येकी एक सदस्य या समितीत समाविष्ट करण्यात आले आहे. NAAC च्या मार्गदर्शक तत्वानुसार सदर समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती विभागीय केंद्राचे कामकाज अधिकाधिक कार्यक्षम होण्यासाठी कार्य आढावा तयार करून विभागीय केंद्राच्या कार्यपढतीत अपेक्षित बदल वा सुधारणा तथा मार्गदर्शन करेल. प्राचार्य डॉ देव्हडे यांचे नियुक्तीne शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नियुती बद्दल जीवन विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबाराव पाटील, सचिव अमित पाटील तसेच शैक्षणिक वर्तुळातून अभिनंदन होत आहे.