spot_img
spot_img

अमंली पदार्थ विरोधी दिनाचा जिल्हा पोलीस दलाकडून जागर! – एसपी निलेश तांबे राबवणार ‘मिशन परिवर्तन!’ – पावसाने घातला बाईक रॅलीत खोडा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) तरुणाईमध्ये ‘ड्रग्ज’ घेणं हे आजकाल ट्रेंड बनत चालले आहे. स्वत:ला ‘कूल’ दाखवण्याच्या नादात तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचे सेवन वाढले आहे. कोणत्याही व्यसनाचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. दारु असो वा सिगारेट यांच्या सेवनामुळे जीवघेणे आजार होतात. याबाबत जागृती करण्यासाठी ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना’ची सुरूवात करण्यात आली. या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने आज या संदर्भात जागर केला. सहकार विद्या मंदिरात पत्रकार परिषदेत एसपी निलेश तांबे यांनी ‘मिशन परिवर्तन’ राबविण्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान बाईक रॅली कडून जनजागृती करण्याचे ठरले असताना पावसाने व्यत्यय आणला आहे.

लोकांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरुक करण्यासाठी तरुण मंडळी, किशोरवयीन मुलांमधील अंमली पदार्थांचे व्यसन रोखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तसेच ड्रग तस्करी रोखण्यासाठीही या मोहीमेला सुरुवात करण्यात आली. आज सर्वत्र अंमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती होत आहे. त्यातून लोकांना होणाऱ्या हानींची जाणीव करून देण्याचे प्रयत्न सर्वत्र चालू आहेत. ड्रग्जची अवैध तस्करी रोखण्यासाठी कडक कायदे आहेत.या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आज चिखली रोड वरील सहकार विद्या मंदिर येथे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी डॉ. सुकेश झवर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.दरम्यान एसपी निलेश तांबे यांनी मिशन परिवर्तन द्वारे अंमली पदार्थविरोधात विविध कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्याचा निर्धार केला आहे.यासंदर्भात विविध सामाजिक संस्थांचे सुद्धा सहकार्य लाभणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. दरम्यान भर पावसात अंमली पदार्थ विरोध दिना निमित्त बाईक रॅली काढून जनजागृती करण्याचे ठरले होते.परंतु पावसामुळे अद्याप रॅलीला सुरुवात झाली नव्हती.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!