spot_img
spot_img

आयुष मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले… ‘योग साधनेला अंगीकारा!’ – आंतरराष्ट्रीय योग दिन विशाखापट्टणम येथे आयोजित!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) योगाला आपली जीवनशैली बनवा. प्रत्येकाने किमान एक तास तरी योग साधना करा, लहानापासून तर थोरांपर्यंत सर्वांनीच योग साधनेत सहभागी होऊन निरोगी जीवन अंगीकारावे, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

11 व्या आंतरराष्ट्रीय योग कार्यक्रम संदर्भात माहिती देण्यासाठी बुलढाणा येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते. ते पुढे म्हणाले की अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतामध्ये आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू ,नागरी उद्यानमंत्री राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे आरोग्यमंत्री सत्यनारायण यादव उपस्थित राहणार आहेत. भारतातील 1 लाखाहून अधिक ठिकाणी एकाच वेळी हा कार्यकम आयोजित करण्यात येणार आहे,अशी माहिती यावेळी केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. या सभेने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता दिली आणि 2015 पासून हा 21 जून हा दिवस सर्व जगभरात मोठ्या उत्साहाने योग दिन म्हणून साजरा केला जातो. आज कुठलाही आजार होऊ नये यासाठी योग केला जातो तर आजार बरा व्हावा यासाठी सुद्धा योग साधना केली जाते. भारतीय योग साधना सर्व जगामध्ये निरोगी आयुष्यासाठी केली जाते. देशातील सर्व एम्स हॉस्पिटलमध्ये योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतल्या जात आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
“योग फॉर वन अर्थ, वन हेल्थ” ही थीम भारताच्या 2023 मधील G20 अध्यक्षपदकालीन “वन अर्थ, वन हेल्थ” दृष्टिकोनावर आधारित आहे. हा दृष्टिकोन वैयक्तिक आणि ग्रहाच्या कल्याणाच्या परस्परसंबंधांवर जोर देतो, ज्यामध्ये भारतीय तत्त्वज्ञानातील सामूहिक कल्याणाचे प्रतिबिंब दिसते. “सर्वं संतु निरामया” (“सर्वांनी रोगमुक्त व्हावे”) हा मंत्र, विशेषतः कोविड-19 नंतरच्या जगात, लवचिक आरोग्य व्यवस्था, प्रतिबंधात्मक काळजी आणि सामूहिक जागतिक प्रयत्नांच्या महत्त्वाला पूर्णपणे व्यक्त करतो. असे ते म्हणाले योगा संदर्भात 10 वेगवेगळे पॅकेट्स तयार करून त्यामध्ये योगासणे निवडण्यात आली आहेत. प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत योग साधनेला अंगीकारावे हा त्यापाठीमार्गील उद्देश असल्याचे सांगितले. शालेय शिक्षणामध्ये योग प्रशिक्षण अभ्यासाचा समावेश करण्यात आल्याचे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!