सुटाळा ता.खामगाव (हॅलो बुलडाणा) गावातील तेजस्वी तारा, सर्वांचा लाडका आणि अभ्यासात तल्लख असलेला चि. शुभम रामेश्वर दुतोंडे याचे अपघाती निधन झाले. रविवार, १ जून रोजी एमपीएससी परीक्षेसाठी अकोला जात असताना हायवेवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत शुभम गंभीर जखमी झाला. तातडीने अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मेंदूला जबर मार लागल्याने लगेच ऑपरेशन करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र नियतीच्या आघातापुढे सारे हतबल ठरले आणि ४ जून रोजी सायंकाळी त्याला मृत घोषित करण्यात आले.
शुभम बी.टेक पदवीधर होता आणि शासकीय सेवेसाठी झपाट्याने अभ्यास करत होता. त्याचे वडील रामेश्वर दुतोंडे हे हिंदुस्तान लिव्हरमध्ये कार्यरत असून, सामाजिक, राजकीय व प्रॉपर्टी क्षेत्रात अत्यंत प्रेमळ व आपुलकीच्या स्वभावासाठी ओळखले जातात. पवन वकील आणि मुलगी सिव्हिल इंजिनिअर आहे. परिवारातील हा उज्ज्वल तारा अचानक निखळल्याने गावावर शोककळा पसरली आहे.