बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आधीचे जिल्हा संपर्कप्रमुख पद रद्द करून आमदार संजय गायकवाड यांची आज ३ जून रोजी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जिल्हा संघटक प्रमुख पदी नियुक्ती केली आहे.
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत ना. एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी आमदार गायकवाड यांच्या कुशल नेतृत्व पाहून सदर नियुक्ती करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमदार गायकवाड यांच्या नेतृत्वात होतील. तसेच पक्षांतर्गतील सर्व संघटना आमदार गायकवाड यांच्या पदाच्या अधिनस्थ राहून काम करणार आहे.