बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘चहा पेक्षा कॅटली गरम’ असं कुठे असतो राव? खरे तर उबाठा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी खरं पचवणे शिकले पाहिजे.असे आम्ही म्हणत नाही तर अनेकांचे म्हणणे आहे. बुधवत यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या दरबारात तक्रारींचा पाऊस पडला आहे.
राष्ट्रवादीच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याने बुधवतांचा कोट्यवधींचा घोटाळा सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल केला होता. हा संपूर्ण घोटाळा ‘हॅलो बुलढाणा’ लवकरच उजागर करणार आहे. विशेष म्हणजेजालिंदर बुधवत यांचा तिकीटासाठीचा बालहट्ट पाहता राजकीय वर्तुळात हशा पिकत आहे. जालिंदर बुधवत साहेब ‘तुम्ही फक्त ठेकेदारी करा.. आमदारकीचे स्वप्न बघू नका..’ असा सूर राजकीय वर्तुळात अनेकांनी आवळला आहे. यात भारीस भर म्हणून बुधवत यांची तक्रार थेट उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्हा शिवसेनेतील प्रमुख 38 पदाधिकाऱ्यांच्या नावाने एक पत्र उध्दव ठाकरेंना अधोरेखित करण्यात आले. त्यात उद्धव त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकी बुधवत यांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवला नाही. बुलडाणा विधानसभा मतदारसंघ सोडता इतर मतदारसंघात केवळ वरकरणी प्रचार केला. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात जिल्हाप्रमुख बुधवत यांनी ब्र शब्द देखील काढला नाही.
पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. महायुतीचेउमेदवार प्रतापराव जाधव व बुधवत यांचे व्यक्तिगत आर्थिक हितसंबंध आहेत. जालिंधर बुधवत पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सन्मान करत नाहीत. पदाधिकाऱ्यांना पद काढण्याची धमकी देतात. माझे कुणी वाकडे करू शकत नाही, असे उध्दव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे.बुधवत यांनी जिल्ह्यात शिवसेना वाढवली नाही, केवळ कागदावर संघटन आहे असाही आरोप पत्रात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत
बुधवत यांना तिकीट मिळणे ‘मुश्कील ही नही, नामुमकीन है! असे जाणकार सांगत आहेत.