spot_img
spot_img

पिण्याच्या पाण्यात नाल्याचे घाण पाणी! – संतापलेल्या महिलांनी केले आंदोलन!

रोहिणखेड (हॅलो बुलडाणा) वार्ड क्रमांक ३, दलित वस्ती येथे पिण्याच्या पाण्याच्या हापशीत नालीचे घाण पाणी मिसळत असल्याने संतप्त महिलांनी शेषराव इंगळे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन केले.गेल्या अनेक दिवसांपासून या समस्येवर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक याच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. परिणामी, नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येच्या तातडीने सोडवणुकीसाठी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक रहिवासी वंदना गोरे म्हणाल्या, “वारंवार तक्रार करूनही प्रशासन हलत नाही. दूषित पाणी पिऊन लहान मुले आणि वृद्ध आजारी पडत आहेत. जर लवकर उपाययोजना झाली नाही, तर आम्हाला अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल.”
शेषराव इंगळे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “गावातील नाले स्वच्छ करून पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ न केल्यास आणि घाण पाणी येणे थांबवले नाही तर १ एप्रिल रोजी नाल्यांमधील घाण पाणी ग्रामपंचायत भवनामध्ये टाकण्याचा इशारा आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला व अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.” यावेळी महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!