spot_img
spot_img

💥परिवर्तनाचे वारे! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महावि आघाडीवरच राहील! – आमदार सिद्धार्थ खरातांचा विश्वास!

मेहकर (हॅलो बुलडाणा) मेहकर मतदार संघातील परिवर्तनाचे वारे जिल्हाभर खेळणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी जिल्ह्यात भक्कम झालेली दिसून येईल असा विश्वास आमदार सिद्धार्थ खरात यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आमदार खरात यांनी मेहकर विधानसभा मतदार संघातील मागील सहा महिन्याचा यशस्वी आराखडा पत्रकार परिषद 28 मे रोजी घेतली.

या सहा महिन्याच्या कारकिर्दीत केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडला.प्रामुख्याने मेहकर शहरात
1989 मध्ये एमआयडीसी साठी 53 एकर जागा देण्यात आली होती मात्र बहुतांश जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. हे अतिक्रमण काढून या ठिकाणी आता 15 एमआयडीसी चे प्लॉट उपलब्ध झाले आहेत. लवकरच त्याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, तसेच दोनशे एकर जागा शासकीय अथवा खाजगी स्वरूपातली जागा भूसंपादन करून देण्याचे आश्वासन
मला दिल्याचे आ. खरात म्हणाले. अतिक्रमण काढल्याने सर्व गाळेधारकांना बस स्टॅन्ड समोरील तीनशे प्लॉटचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पेनटाकळी हा मध्यम स्वरूपाचा प्रकल्प सुरू झाल्यापासून पेनटाकळी गावामध्ये निवासाचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. गावठाण जमिनीची हद्द वाढ या कारणामुळे होऊ शकली नव्हती. हा प्रश्न धसास लावला असून पेनटाकळी प्रकल्पातील 401 नागरिकांना पेनटाकळी येथे प्लॉटचे वाटप करण्याचे माझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाची घटना असल्याचे आमदार खरात म्हणाले.तसेच विधानसभा निवडणुकीत नागरीकांना दिलेल्या इतरही आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आम. सिद्धार्थ खरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या पत्रकार परिषदेत उपजिल्हा प्रमुख प्रा.आशिष रहाटे, मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, युवा सेना तालुका अध्यक्ष ॲड आकाश घोडे, सर्कल प्रमुख साहेबराव हिवाळे, ॲड संदीप गवई, पंडित बापू देशमुख,उपसरपंच गजानन राठोड,गणेश सवडतकर, विजय मोरे, जीवन घायाळ, स्वप्नील हाडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!