बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सलग तीनदा निवडून आलेले माजी आमदार तथा भाजपाचे घाटावरील जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या कन्येचा आज शुभविवाह आहे. त्यांचे निकटवर्ती असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्न सोहळ्याला धावती भेट देणार आहेत.दरम्यान मलकापूर मार्गावरील म्हाडा कॉलनी येथे भाजप जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.या विवाह सोहळ्याला सर्वच क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे.
विजयराज शिंदे यांच्या डॉ. शिवानी व डॉ. निलेश यांचा विवाह सोहळा आज मलकापूर येथील बुलढाणा रेसिडेन्सी येथे संपन्न होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस 11 वाजून 50 मिनिटांनी छत्रपती संभाजी नगर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलढाणाकडे रवाना होतील. 12 वाजून 20 मिनिटांनी ते बुलढाणा येथे दाखल होतील.12 वाजून 30 मिनिटांनी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे ते पोहोचतील. दुपारी 1 वाजता भाजपाच्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन करून दीड वाजता बुलढाणा येथील हेलिपॅड वर पोहोचून 2 वाजता छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील. दरम्यान विजयराज शिंदे यांच्या कन्येच्या लग्न सोहळ्यात चंद्रशेखर बावनकुळे, ना. प्रतापराव जाधव, ना. आकाश फुंडकर आदींची उपस्थिती राहील.