बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सलग तीन वेळा बुलढाण्याचे आमदार राहिलेले विजयराज शिंदे सध्या भाजपाचे लोकसभा निवडणूक संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी आता बुलढाणा भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन त्यांची नियुक्ती केली आहे. तर घाटाखाली सचिन देशमुख यांची भाजपा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
विजयराज शिंदे यांनी लोकसभा निवडणूकीत तीन मतदारसंघात दिग्गज मंत्र्यांना मात देत भाजपाचे उमेदवार निवडून आणले आहे. विजयराज शिंदे यांनी जेव्हापासून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून पायाला भिंगरी लावून त्यांनी संघासोबत जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे काम केले.भाजपा पक्षाला आलेली मरगळ दूर करून पक्षाला नव संजीवनी दिली. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली असून पक्षश्रेष्ठींनी विजयराज शिंदे यांना बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.