बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिस्तबद्ध कार्यप्रणाली राबविणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या 21 पोलीस कर्मचाऱ्यांना बुलढाणा पोलीस मुख्यालयाला अटॅच केले आहे.
9 मे रोजी पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा शहर, बुलढाणा ग्रामीण, चिखली, देऊळगावराजा, धाड, धामणगाव बढे,किनगांव राजा,बीबी,
अमडापूर,मेहकर,नांदुरा, खांमगाव शिवाजीनगर, सिंदखेडराजा, शेगाव शहर, तामगांव या 16 ठाण्यातील 21 पोलीस कर्मचाऱ्यांना अचानक एका आदेशान्वये बुलढाणा पोलीस मुख्यालय अटॅच केले आहे.या 21 कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवल्याची माहिती मिळत आहे. पोलीस अधिक्षकांनी 21 कर्मचाऱ्यांवर ही कारवाई केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.दरम्यान कर्तव्यात कसूर खपवून घेणार नसल्याची जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची भूमिका प्रशंसनिय ठरत आहे.