spot_img
spot_img

💥BIG NEWS पाकिस्तानचे ड्रोन महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात घालते घिरट्या? – सिंदखेड राजा परिसरात ड्रोण सदृश्य वस्तू दिसल्याने खळबळ?

बुलढाणा/मुंबई (हॅलो बुलडाणा) पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढला असून चहूबाजूने गोळीबार आणि हवाई हल्ला सुरू आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पाकिस्तानकडून ड्रोण हल्ले सुरू आहे.मात्र भारताने सर्व ड्रोण हल्ले हाणून पाडले. आज पुन्हा उरी सेक्टरमध्ये संध्याकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची घटना समोर आली आहे. त्याच दरम्यान, महाराष्ट्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील परभणी, बुलढाणा आणि जालना या जिल्ह्यात ड्रोण सदृश वस्तू दिसली आहे. विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे सुद्धा ड्रोण सदृश्य परिस्थिती दिसल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.परभणीच्या सेलू, गंगाखेड तालुक्यातून
आकाशात ड्रोन सदृश वस्तू दिसली आहे. मात्र,गावकऱ्यां मध्ये कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे. एकीकडे भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु आहे. त्याच अनुषंगाने अनेक ठिकाणी मॉक ड्रिल घेतलं जात आहे.याच दरम्यान परभणीच्या सेलू आणि गंगाखेड तालुक्यातून आकाशात एकाच लाईनमध्ये अनेक ड्रोण सदृश्य वस्तू दिसल्या आहेत. ग्रामीण भागात यामुळे कुतूहलला विषय झालाय. या काही भागात भीतीचं वातावरणही पसरलं आहे.

तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरात काल सायंकाळी अनेक वस्तू आकाशातून एका रांगेत जाताना दिसल्या. चकाकणाऱ्या या रांगेत जाणाऱ्या आकाशातील वस्तूंमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.नेमक्या बाबी काय आहे? याबाबत आता परिसरात चर्चेला उधाण आलं आहे. तिकडे भारत-पाकमध्ये हल्ला सुरु असताना अशा वस्तू आकाशातून जाताना दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या कोणत्या वस्तू आकाशातून जात आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.जालना जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी, पराइन याठिकाणीही ड्रोण सदृश वस्तू दिसल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!