spot_img
spot_img

रविकांत तुपकर गरजले! म्हणाले… ‘हक्काच्या कर्जमुक्तीसाठी व उर्वरित पिकविम्यासाठी राज्यभर आंदोलन उभारणार!’ -तुपकरांच्या जांभूळधाबा येथील एल्गार सभेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

मलकापूर (हॅलो बुलडाणा) सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे साफ दुर्लक्ष करत आहे. शेतकरी प्रचंड संकटात असताना सरकार झोपेचे सोंग घेत आहे. पण आम्ही शेतकरी या देशाची भूक भागवणारे आहोत. आमच्या हक्कांसाठी आता तडजोड करणार नाही. बहिऱ्या शासनाला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांचा गगनभेदी आवाज करू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. जांभूळधाबा ता. मलकापूर येथे आयोजित भव्य एल्गार मेळाव्यात ते बोलत होते.

मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा येथे ८ मे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्याने संपूर्ण जिल्हा हादरवून सोडला. हजारो शेतकरी, महिला, तरुण आणि कष्टकऱ्यांची झंझावाती उपस्थिती या मेळाव्याला दिसून आली. यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून टीका केली. शासन जर शेतकरी शेतमजूर आणि सर्व सामान्यांचे प्रश्न दुर्लक्षित करणार असेल, तर रस्त्यावरून दिल्ली पर्यंतचा आवाज बुलंद केला जाईल.
हा फक्त एल्गार नाही तर हे निर्णायक संघर्षाचं रणशिंग आहे, असा आक्रमक इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी केला. कर्जमाफीचं काय? – घोषणाबाजी करायची आणि अमलबजावणी शून्य? पीकविमा कुठं गेला? – पावसाळा बघायची वेळ आली, पण शेतकऱ्याच्या खात्यात अजून एक रुपयाही नाही?प्रजन्यमापक यंत्रं फसवतात, आणि विमा कंपन्या गोंधळात गाडून टाकतात हे आम्ही किती दिवस सहन करायचं?
एकिकडे फळबागा लावायला सरकार सांगतं, पण फळबागांचा पिकविम्यात समावेश नाही हे काय धोरण आहे? शेतमालाला हमीभाव नाही, नुकसानभरपाई मिळत नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीच उपाय योजना नाही. तर दुसरीकडे शेतकरी पुत्रांच्या हाताला काम नाही, रोजगार नाही, नोकऱ्या नाहीत मग आम्ही जगायचं कसं?” असा प्रश्न उपस्थित करत रविकांत तुपकरांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्याऐवजी बहिरेपणाचे सोंग घेणाऱ्या या बहिऱ्या शासनाला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांचा गगनभेदी आवाज करू असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला. सरकारने कर्जमुक्तीचे आश्वासन पाळणे व आजही अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहे. त्यांना हक्काचा पिकविमा मिळाला पाहिजे. सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाच्या बुडाखाली आग लावण्यासाठी, कर्जमुक्ती, पिकविम्याच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन उभारणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल राउत, सचिन शिंगोटे, गजानन भोपळे, हर्षल मोरे, अमोल मोरे, आकाश माळोदे, निलेश गवळी, उमेश राजपूत, बंडू देशमुख, परमेश्वर मोरे, निखील पाटील, रामा गावंडे, प्रतिक पाटील, धनराज पाटील, कुशल सोनवणे, महादेव मोरे, सारंग झांबरे, पवन चोपडे, अविनाश वाघोदे, संदीप कुंबेथोप, उमेश सपकाळ, नरेश इंगळे, समाधान कुयटे, राहुल पाटील, गणेश दीक्षित, विठ्ठल गायकवाड, गणेश गायकवाड. यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!