spot_img
spot_img

💥EXCLUSIVE! मलकापूर – चिखली मार्गाचे होणार चौपदरीकरण! – चिखली रोड वरील महागड्या जमिनी रस्ते रुंदीकरणात जाण्याची भिती! 15-20 हजार स्क्वेअर फुट भावाच्या जमिनी आता रस्त्याखाली जाणार?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील चिखली मार्गावरील दुर्तफा जमिनीचे भाव गग्नाला भिडले.अनेकांनी प्रॉपर्टी घेऊन ठेवली मात्र आता या मार्गाचे लवकरच चौपदरीकरण होण्याचे संकेत आहेत.त्यामुळे खरेदी करून ठेवलेल्या जमिनी ह्या रस्ते रुंदीकरणात जाणार असल्याची शक्यता आहे. परिणामी काहींनी सतर्कता ठेवून या मार्गावरील व्यवहार थांबविले असून,लवकरच मलकापूर ते चिखली नॅशनल हायवे मार्गाचे काम सुरू होणार असल्याची माहिती आहे.

मलकापूर ते चिखली मार्गाचे चौपदरीकरण होणार असून याची वरिष्ठ स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असली तरी,सदर मलकापूर ते चिखली हा मार्ग सध्या बीओटी तत्त्वावर बुलढाणा अर्बन बँकेच्या अधिपत्याखाली आहे.मलकापूर रोडवरील एआरडी सिनेमा हॉल पासून तर चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिर पर्यंत कमालीची रहदारी व वाहनांची वर्दळ असते.चिखली मार्गावर तर अनेकांनी 15 ते 20 हजार रुपये स्क्वेअर फुट प्रमाणे जमिनी घेऊन ठेवल्या, बंगले बांधले.परंतु हा मार्ग नॅशनल हायवे म्हणून नवी ओळख निर्माण करेल. यासंदर्भात रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 1200 कोटी रुपयांची घोषणा देखील केली आहे.शिवाय नॅशनल हायवे साठी केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव,आमदार संजय गायकवाड, आमदार सुख चैन संचेती,
आमदार श्वेता महाले यांचा विशेष आग्रह आहे. विशेष म्हणजे हा मार्ग बुलढाणा अर्बनच्या बीओटी तत्त्वातून काढावा लागणार आहे आणि बुलढाणा अर्बनला देय रक्कम राज्य शासनाला द्यावी लागणार आहे. त्यानंतर नॅशनल हायवे महामार्ग होऊ शकते.ही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!