बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता राजकीय आरोप प्रत्यारोपाने वातावरण तापताना दिसते. आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दलच्या वादग्रस्त विधाना नंतर माफी मागितली.परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हीच ‘री’ ओढत गायकवाड यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
‘बुंदो से गई वो हौदोसे नही आती’ अशी समाज माध्यमासमोर सुरुवात करून हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड यांनी माफी काय मागितली..त्यांच्यावर गुन्हा काय दाखल झाला..हा विषय अलबत्ता!मुळात आमदार गायकवाड यांनी याआधी आरोप केले होते.त्यांच्या परिवाराला धमक्या दिल्याचा प्रयत्न झाला. त्यांचे घर उडवून दिल्याचा प्रयत्न झाला.त्याचे आरोपी कुठे आहेत? धर्मरक्षक संभाजी राजे यांच्या नावाचा उल्लेख असलेले ट्रक टिप्पर सर्रास अवैध वाळू वाहतूक करतात ते कुणाचे आहेत?शहरातील वरली मटका कोणाच्या भरवशावर चालतो? याचे उत्तर मिळाले पाहिजे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.’सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलिसांची ब्रीदवाक्य उलटे काम करत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.ते म्हणाले की जे खालत्व बाळगणारे लोक आहेत.ते तत्कालीन काळात पोलिसांना पाहून पार्श्वभागाला पाय लावून पळायचे. आता अशांना पोलीस सॅल्यूट ठोकत असल्याने पोलिसांची अकार्यक्षमता समोर आली आहे.यावर नेमकी पणाने सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे,असेही सपकाळ यांनी सांगून आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली आहे.त्यांच्या या टीकेला आमदार संजय गायकवाड काय प्रत्युत्तर देतात? याकडे जनतेचे लक्ष आहे. (क्रमशा:)