बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी देशातील रोहंग्या व पाकिस्तानी नागरिकांना देशा बाहेर हाकला, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान यांना करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला.अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत, कलमा पठन करायला सांगत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या क्रूर हिंसेमध्ये 26 पर्यटकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे या हल्लेखोरांवर हल्ला चढवून त्यांना नेस्तनाबूत करण्यात यावे तसेच देशातील रोहंग्या व पाकिस्तानी नागरिकांना देशा बाहेर हाकलावे, अशी मागणी एका निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान यांना करण्यात आली आहे.या निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी केले.