बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्यात आज राजकीय वादळ उसळले! येळगाव ग्रामपंचायतीचे सत्ताधारी सरपंच दादा लवकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. बुलढाण्यात आयोजित शिंदे यांच्या आभार दौऱ्याच्या मंचावरच त्यांनी भगवा फडकावत नवा राजकीय रंग दाखवला.फक्त दादा लवकरच नाही, तर अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे. गावपातळीवर याचे मोठे पडसाद उमटले असून, ग्रामपंचायत व जिल्हा राजकारणाचे समीकरणे आता बदलण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने पुन्हा एकदा आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत विरोधकांना जबर धक्का दिला आहे.
- Hellobuldana